वाशिम, दि. २२- शहरामध्ये गत दोन दिवसांपूर्वी १00 रुपये किलोप्रमाणे विक्रीस मिळत असलेले सीताफळे शनिवारी ४0 रुपये किलोप्रमाणे मिळायला लागले. याबाबत चौकशी केली असता, बाजारात मोठय़ा प्रमाणात मराठवाड्यातील सीताफळ विक्रेते वाशिमात दाखल झाले आहेत.वाशिम शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर मोठय़ा प्रमाणात एका रांगेत ६0 ते ७0 सीताफळ विक्रेते बसल्याने याकडे कोणाचेही लक्ष जात आहे. अचानक शहरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सीताफळांचे उत्पादन कसे झाले, याबाबत नागरिकांना प्रश्न पडला. दोन दिवसांआधी १00 रुपये किलोप्रमाणे मिळणारे सीताफळ आज ४0 रुपयांत विकल्या गेले. मराठवाड्यात मोठय़ा प्रमाणात सीताफळ असल्याने तिकडेसुद्धा भाव नसल्याने आम्ही वाशिममध्ये आल्याची माहिती एका सीताफळ उत्पादकाने दिली. केवळ ४0 रुपये किलोप्रमाणे सीताफळ मिळत असल्याने नागरिकांनीसुद्धा खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
मराठवाड्यातील सीताफळे वाशिमात विक्रीस!
By admin | Published: October 23, 2016 1:39 AM