पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, २७ जून रोजी पीडितेचा पती व मुलगा तेरवीला गेले होते, तेव्हा ती घरात एकटीच होती. रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास नंदू प्रल्हाद भगत हा पीडितेच्या घरात आला आणि वाईट उद्देशाने हात दाबला. पाऊस सुरू असल्याने घरातील लाइट बंद होती. त्यास विरोध केला असता गणेश नरेंद्र भगत, वंदना नरेंद्र भगत, सरिता राजीव भगत, राजीव प्रल्हाद भगत हे सर्व पीडितेच्या घरात आले आणि विळ्याने मान कापतो अशी धमकी देऊन लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली, तसेंच पीडितेच्या मुलास मारून टाकण्याची धमकी दिली. अशा जबानीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी नंदू प्रल्हाद भगत, गणेश भगत, वंदना भगत, सरिता भगत, राजीव भगत (सर्व राहणार आमगव्हान) यांच्या विरुद्ध कलम ३५४ अ, ४५२, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पांडुरंग बेंद्रे करीत आहेत.
विवाहितेचा विनयभंग, पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:26 AM