वाशिम: येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त कारंजा येथील बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती सचिवांनी गुरुवारी दिली.
---------------
विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
वाशिम: शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर वाशिम नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कारवाई केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी स्वत: या मोहिमेत सहभाग घेतला होता.
---------------
सौरपंप योजनेत अर्जांचे आवाहन
वाशिम: महावितरणकडून नव्या कृषी धोरणांतर्गत शेतकऱ्यांना त्वरित सौरकृषी पंप जोडणी दिली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी गुरुवारी केले.
---------------
शेतमाल ठेवण्यास अपुरी जागा
वाशिम: जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या ओट्यांवर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल ओट्याखाली टाकावा लागत असल्याचे चित्र गुरुवारी विविध बाजार समित्यांत पाहायला मिळाले.
------