लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मूगाला हमीभावापेक्षा अल्प दर मिळत असल्याने शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडत आहे. हमीभावाने मुग व उडदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना पावसाची योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग व उडदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. नैसर्गिक संकटे झेलत असतानाच, आता मानवनिर्मित चक्रव्यूहात बळीराजा अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. २०१७-१८ या हंगामातील मूग व उडीद बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मूग पिकाला ५३७५ रुपये दर व २०० रुपये बोनस असा एकूण ५५७५ रुपये हमीभाव तर उडीद पिकाला ५२०० रुपये दर व २०० रुपये बोनस असा एकूण ५४०० रुपये हमीभाव जाहिर करण्यात आला आहे. या हमीभावानुसार चांगल्या दर्जाच्या उडीद व मूगाची बाजार समितीत खरेदी होणे अपेक्षीत आहे. मात्र, कोणत्याच दर्जाच्या मूग व उडदाची खरेदी बाजार समितीत हमीभावाने सुरू नसल्याचे वास्तव आहे. हमीभावापेक्षा थोड्याफार कमी फरकाने मूग व उडादाची खरेदी झाली तरीदेखील शेतकºयांना फारसा तोटा होणार नाही. मात्र, हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते १३०० रुपयापेक्षा कमी दराने उडीद व मूगाची खरेदी होत असल्याने शेतकºयांचे संपूर्ण बजेट कोलमडून जात आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी मागणी सर्वांकडूनच केली जाते. मात्र, अद्यापही उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून कष्ट करणाºया बळीराजाला सुरूवातीला पेरलेले उगवेल का याची चिंता असते. जे उगवले ते कवडीमोलाने विक्री होत असल्याची वेदना घेऊनच वाटचाल करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. शेतकºयांचा शेतमाल बाजारात आला की गगनाला भिडलेले भाव तळाशी येतात, हा दरवर्षीचा अनुभव आताही शेतकºयांना येत आहे. अल्प भाव मिळत असल्याने लागवड खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ बसविण्यात शेतकºयांची झोप उडाली आहे.गुरूवारी जिल्ह्यातील बाजार समितींमधील उडीद व मूगाच्या बाजारभावावर नजर टाकली असता, हमीभावापेक्षा १२०० रुपयांनी खरेदी सुरू असल्याचे दिसून आले. उडदाला ३५०० ते ४२०१ रुपये तर मूगाला ४००० ते ४४०० रुपये क्विंटल असा बाजारभाव होता. मूगाची आवक ७५० क्विंटल तर उडदाची आवक २७५० क्विंटल होती.नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार !मूग व उडदाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमतीने उडीद व मूगाची खरेदी होण्यासाठी नाफेड केंद्र सुरू करावे, अशी मागणी वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कटके यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांशी संपर्क साधून, २५ सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केला आहे. नाफेडमार्फत मूग व उडाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत प्रधान कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना पत्राद्वारे केली आहे.
बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 7:18 PM
वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मूगाला हमीभावापेक्षा अल्प दर मिळत असल्याने शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडत आहे. हमीभावाने मुग व उडदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना केली आहे.
ठळक मुद्देमूग, उडदाची अल्प दराने खरेदी नाफेड केंद्राबाबत जिल्हा उपनिबंधकांचे मार्केटिंग अधिका-यांना पत्र