वाशिम: लागोपाठ तीन दिवस सुट्या आल्याने जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहिल्या, परिणामी सणउत्सवाच्या तयारीसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे पीक उत्पादनात घट आल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच शनिवार ३० सप्टेंबरपासून सोमवार २ आॅक्टोबरपर्यंत सुट्यांमुळे बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंदच राहिल्या. अशात यंदाच्या खरीपात पीकलेला थोडाथोडका शेतमाल विकून आगामी सण, उत्सवांसह पुढच्या हंगामाची तयारी करणाºया शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागला. शनिवार ३० सप्टेंबर रोजी विजयादशमीच्या सणानिमित्त, तर रविवारी शासकीय सुटी आणि २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बाजार समित्या आणि बँकांही बंद राहिल्या अशा परिस्थितीत शेतकºयांना रस्त्यावरील चिल्लर व्यापाºयांकडे कवडीमोल भावाने शेतमाल विकून आपल्या गरजा भागवाव्या लागल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून हमीभावाने खरेदीला खो दिला जात आहे. तथापि, बाजार समित्यांमध्ये लिलावात हमीभाव नाही, पण व्यापाºयांकडून लागणाºया बोलीमुळे साधारण बरे दाम शेतकºयांना मिळतात. आता बाजार समित्याच बंद राहिल्याने शेतकºयांना चिल्लर व्यापाºयांना त्यापेक्षाही खूप कमी भावांत शेतमाल विकावा लागल्याचे दिसून आले.