लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे सणोत्सवांमुळे पैशांची नितांत गरज भास त असताना महत्प्रयासाने सोंगून विक्रीसाठी तयार असलेले सोयाबीन घरातच पडून राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदाचे वर्ष शेतकर्यांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक ठरले असून, गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल २00 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतु त्या तही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकर्यांना सामना करावा लागला. अशातच खरीप हंगामास प्रारंभ झाला. मात्र, सुरुवाती पासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबीनची पार दाणादाण उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर मात करीत शेतकर्यांनी सोयाबीनची सोंगणी केली आहे; परंतु सरासरी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून, लावलेला लागवड खर्चदेखील वसूल होणे कठीण झाले आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर ज्या शेतकर्यांनी सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणणे सुरू केले आहे, त्यांची व्यापारीवर्गाकडून प्रचंड हेटाळणी सुरू असून, अपेक्षित तथा योग्य दर मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच बाजार समि त्यांनीदेखील याबाबत कमालीची उदासीनता बाळगली असून, येत्या १८ ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन बाजार समित्यांनी किमान दिवाळीच्या दुसर्या दिवसापासून तरी व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी शे तकर्यांमधून होत आहे.
व्यापार्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळले!वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणीधारक व्या पार्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मनमानी कारभार सुरू केला असून, कुठल्याही व्यापार्याच्या घरी कुठलाही कार्यक्रम (मरण-धरण, विवाह सोहळा, वाढदिवस) असला, तरी ठरावीक त्यादिवशी बाजार समितीमधील व्यवहार पूर्णत: बंद ठेवले जात आहेत. परिणामी, वर्षभरातून जास्तीत जास्त सहाच महिने बाजार समिती सुरळीत सुरू असते. यात शेतकर्यांना नाहक मन:स्ताप सोसावा लागत असून, व्यापार्यांच्या या मनमानीला शेतकरी कंटाळल्याची माहिती बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांनी दिली.
दिवाळी सणानिमित्त बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवणे, हा त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. असे असले तरी बाजार समिती प्रशासनाशी चर्चा करून पाच दिवसांऐवजी दोन दिवस बंद ठेवून व्यवहार पूर्ववत करण्याबाबत सूचना दिल्या जातील.- रमेश कटकेसहायक उपनिबंधक, वाशिम