वाशिम : फळे व भाजीपाला नियंत्नणमुक्त करतानाच शेतकर्यांऐवजी खरेदीदाराकडून व्यापार्यांचे कमिशन (अडत) घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, अडत्यांनी सोमवारी पुकारलेला बाजार समिती बंद दुसर्या दिवशीही सुरूच होता. मंगळवारी एकही बाजार किंवा उपबाजार समिती सुरू नव्हती.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची थेट विक्री करणार्यांना शासनाने सर्व नियमातून सूट देतानाच, बाजार समितीमध्ये मात्न शेतकर्यांऐवजी ग्राहकांकडून अडत घेण्याचे बंधन घातले. या प्रकारचा निषेध करण्यासाठी व्यापार्यांनी बेमुदत सामूहिक आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या आंदोलनात वाशिम व मालेगाव बाजार समिती दुसर्या दिवशी सहभागी नसल्याची माहिती आहे; परंतु दोन्ही समित्या काही कारणांमुळे बंद होत्या. वाशिम येथे नाणेटंचाई असल्याने बाजार समिती बंद असल्याचे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे.मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मानोरा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून शिरपूरजैन, अनसिंग, राजगाव या ठिकाणी उपबाजार समिती अस्तित्वात आहे. व्यापार्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार सलग दुसर्या दिवशीही ठप्प होते. सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांकडून एकूण रकमेच्या ८ टक्के अडत वसूल केली जाते; मात्र शेतकर्यांच्या हितास्तव शासनाने शेतकर्यांकडून अडत वसूल न करता ग्राहकांकडून वसुलीचा निर्णय घेतला. त्यास व्यापार्यांनी विरोध दर्शविला आहे.
दुस-या दिवशीही बाजार समित्या बंद!
By admin | Published: July 13, 2016 2:24 AM