लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महिलांचा सण मकरसंक्रातनिमित्त बाजारात खरेदीसाठी मोठया प्रमाणात आज १४ जानेवारी रोजी गर्दी झालेली दिसून आली. मकरसंक्रातीनिमित्त लागत असलेल्या वाण, पदार्थ, फळांनी आज बाजारपेठ फुलली होती. विशेष म्हणजे बाजारात उखाण्यांची पुस्तकेही विक्रीस आली होती.१५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्याने बाजारात गत आठ दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. आज गर्दीने मोठा उच्चांक गाठल्याने रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी असल्याने वाहतुक विस्कळीत झााली होती. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी शहरवाहतूक शाखेच्यावतिने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्यानंतरही काही अनुचित घटना घडल्यात. बाजारपेठेत मकरसंक्राती सणाला लागणाºया वस्तुची खरेदीसाठी मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली तरी वस्तुंचे भाव कमी प्रमाणात होते. गतवर्षी मकरसंक्रातीवरच्ां महागाईची सक्रांत आल्याने गृहीणींचा बजेट कोलमडला होता. मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमानंतर वाण देण्याची पध्दत आहे. या वाणाच्या खरेदीसाठी आज शहरात जागोजागी दुकाने थाटली होती तेथे महिलांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. तसेच लहान मुलांची या दिवशी लुट करण्याची पध्दत आहे त्याकरीताही चॉकलेट सह बोर व इतर पदार्थ खरेदीसाठी एकच गर्दी दिसून आली. काही फळे व वस्तु वगळता यावर्षी मकरसंक्रातीस लागणारे साहित्य स्वस्त दिसून आले. बोरं, ऊस, वाटाणेच्या शेंगा, पेरू, गांजर, भुईमुंग शेंगा असलेली दुकाने एकाच जागी लागल्याने महिलांना खरेदी करतांनासोयीचे झाले होते. भुईमुंग शेंगा व काही पदार्थ १० रूपयांमध्ये ५० ग्रॅम होती मात्र इतर फळे १५ रूपये पावप्रमाणे विकण्यात आली.
मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठ फुलली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 4:23 PM