शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 4:19 PM

मानोरा (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे गुरुवारी ९ मे पासून हळद या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे गुरुवारी ९ मे पासून हळद या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील हळद उत्पादकांना आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, खरेदीच्या पहिल्याच दिवशी शेतकºयांना ६ हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला आहे. मानोरा येथे गेल्या काही वर्षांपासून हळदीच्या उत्पादनात मोठी वाढ होत आहे. तथापि, चांगले उत्पादन होऊनही स्थानिक बाजारात या शेतमालाची खरेदी होत नव्हती. परिणामी तालुक्यातील हळद उत्पादकांना हिंगोली किंवा त्यापेक्षा मोठ्या बाजारात हळद विक्रीसाठी घेऊन जावी लागत होती. त्या ठिकाणी प्रसंगी कमी दर मिळाल्यानंतरही शेतकºयांना हळद विकण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे चांगले उत्पादन घेऊनही पदरी फारसे काही पडत नव्हते. स्थानिक बाजारात हळदीची खरेदी व्हावी, अशी अपेक्षा आणि मागणीही तालुक्यातील हळद उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत होती. आता कृषी उत्पन्न बाजार समिती मानोराने या शेतमालाच्या खरेदीचा निर्णय घेऊन हळद उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे हळद खरेदी करणाºया व्यापाºयांची संख्या जास्त असल्याने शेतकºयांना चांगल्या प्रकारे भावही मिळत आहे. खरेदीसाठी जेवढी स्पर्धा तेवढा अधिक भाव शेतकºयांना मिळतो, अशी माहिती बाजार समितीचे सचिव मनोज इंगोले यांनी दिली आहे. आता मानोरा तालुक्‍यातील हळद उत्पादक शेतकºयांना या शेतमालाच्या विक्रीची सुविधा निर्माण झाली असून, तालुक्यासह जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकºयांनी त्यांनी उत्पदित केलेली हळद विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती हरसिंग चव्हाण व उपसभापती राजेश नेमाने तथा संचालक मंडळाने केले आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी