- नंदकिशोर नारे वाशिम : बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकºयांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. ९ सप्टेंबर रोजी असणाºया या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून बैलांचे साजची दुकाने जागोजागी थाटली आहेत. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे या सणासाठी शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गत दोन वर्षापासून शेतकºयांवर कोसळणारे अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी मात्र समाधानकारक पाऊस, उत्तम पिकांची परिस्थिती असल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पोळा सणासाठी दुकानांवर शेतकºयांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जिल्हयात शहराच्या ठिकाणी ३६ बैलांच्या साज विक्रीची दुकाने थाटली असून याव्यतिरिकत जिल्हयातीलच मोठया बाजारपेठ असलेल्या शेलुबाजार, अनसिंग सारख्या ठिकाणीही काही प्रमाणात दुकाने थाटली आहेत. पोळयानिमित्त शहर ठिकाणी थाटलेली दुकानेदरवर्षी पोळा सणानिमित्त जिल्हयातील वाशिम, कारंजा, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर व मानोरा या शहराच्या ठिकाणी मोठया प्रमाणात बैलांचे साज विक्रीचे दुकाने थाटली जातात. गत दोन वर्षांपासून या सणावर पडत असलेल्या विरजणामुळे दुकानदारांची संख्या रोडावली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस व उत्तम पिक परिस्थितीमुळे दुकानांची रेलचेल दिसून येत आहे. यामध्ये वाशिम शहरामध्ये १०, मालेगावशहरात ६, मानोरा शहरात ४, कारंजा शहरात १०, रिसोड व मंगरुळपीर प्रत्येक ६ बैलांच्या साज विक्रेत्यांची दुकाने लागली आहेत.यंत्राच्या वापरामुळे बैलांच्या संख्येत घट- दिवसेंदिवस यंत्रांच्या वापराामुळे बैलांच्या संख्येत घट होत असल्याने बैलांचे साज विक्री करणाºया दुकानदारांची संख्या रोडावत असल्याचे एका व्यापाºयाने सांगितले. - आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणारा साज खरेदीासाठी शेतकºयांची बाजारात लगबग पहावयास मिळत आहे. - यंदा साजमध्ये खास आकर्षण ठरत असलेल्या विविधारंगी गोंडयांची जोडी. आकर्षक गोंडे शेतकºयांचे लक्ष वेधत आहे.बैलांचा साजाचे भावात स्थिरता !- काही अपवाद वगळता बैलांना सजविण्यासाठी लागणाºया साजच्या भावात स्थिरता दिसून येत आहे. दोरीचे भाव वाढल्याचे सांगून काही ठिकाणी शेतकºयांची लूट होत असून कोणत्याही प्रकारच्या भावात वाढ झाली नसल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. गतवर्षी असलेले व यावर्षीचे भाव समान आहेत.
पोळा सणानिमित्त वाशिमची बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:38 PM