माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर वाळले, माहिती विश्लेषक रवी वानखडे, माहिती संकलक अजय यादव तसेच चाईल्ड लाइनचे समन्वयक महेश राऊत यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.
सदर पथकाने रिसोड पोलीस स्टेशनचे विठ्ठल सांगळे, गोपाल पांडे, महिला पोलीस शिपाई वृषाली ढगे, ग्रामसेवक सदाशिव रेखे, पेडगावच्या सरपंच सविता सुरतकर, बाल संरक्षण समितीचे सदस्य गजानन आंभोरे यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे वडील व कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाइन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.