लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - तालुक्यातील कामरगाव येथील माहेर व मनभा येथील सासर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीसांनी विवाहितेच्या सासरच्या मंडळीविरूध्द २९ आॅक्टोबरला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पिडीत विवाहितेने कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, १३ आॅक्टोबरचे पुर्वी सासरच्या मंडळीने माहेरहून चारचाकी गाडी घेण्याकरीता पैसे आण असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ केला. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून छळ करण्यात आला तसेच विनयभंग सुध्दा करण्याचा प्रयत्न केला. अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी या प्रकरणी भांदविच्या कलम ४९८ अ, ३५४ अ, २९४,५०६, ३४ अन्वये २९ आॅक्टोबर रोजी मो. शारीक अ. साबीर, अ.साबीर अ.कदीर, शबाना परवीन अ. साबीर, अ. शहीद अ. साबीर, अ. जहागीर अ. साबीर, सबा अन्जुम अ. साबीर रा. मनभा यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास जमादार शेषराव जाधव करीत आहेत.
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:46 PM
कारंजा लाड - तालुक्यातील कामरगाव येथील माहेर व मनभा येथील सासर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीसांनी विवाहितेच्या सासरच्या मंडळीविरूध्द २९ आॅक्टोबरला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देसासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा पैशाची मागणी