लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मातंग समाजाचा सामुहिक विवाह सोहळामोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी २१ जोडपी विवाहबध्द झालीत.या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी बहूजन क्रांती सेनेचे संस्थापक अधयक्ष काशीराम उबाळे तर उद्घाटक गोसावी समाज संघटना जिल्हाध्यक्ष, गजानन गिरी तर प्रमुख उपस्थितीत शामभाऊ उफाडे, अखिल भारतीय मातंग संघ विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, बहूजन क्रांती सेना कार्याध्यक्ष युवराज इंंगळे, लहु शक्ती महाराष्ट्र जिल्हा निरीक्षक विलास थोरात , तालुका अध्यक्ष केशव लगड, सामाजिक कार्यकर्ते विजय लोंढे, बबन डाखोरे, भास्कर कांबळे ,केशव डाखोरे, बहूजन क्रांती सेना जिल्हाध्यक्ष रामेश्वर भगवान पाटोळे, विजय गायकवाड, विलास रणशिंगे, मोतीराम धबडघाव, लक्ष्मण पाटोळे, पंढरी काकडे, खंडुजी सुतार, नारायण कांबळे, संतोष खंदारे ,माणिक हिवराळे, आदिंची उपस्थिती होती. तर या मातंग समाजाचा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहू.उद्देशीय संस्था, अध्यक्ष आत्माराम खंडुजी सुतार यांनी केले.सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते महापुरुषांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष आत्माराम सुतार यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बोलतांना काशीराम उबाळे यांनी भावी वधु वरांना शुभाशिष देवुन सामुहिक विवाह सोहळयात लग्न करुन खर्च वाचवुन पुढील आयुष्य सुखाने जगावे असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक आत्माराम सुतार यांच्या कार्याचे कौतुकही केले व सर्व नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. या सामुहिक विवाह सोहळ्यात एकुण २१ जोडपे होते. सामुहिक विवाह सोहळा हा समाज कल्याण कार्यालयाचे विशेष सहाय्याने व त्यांच्यामार्फत राबविण्यात आला. यावेळी जवळपास तीन हजारापर्यंत समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली.
वाशिममध्ये सामूहिक विवाह सोहळा : २१ जोडपी विवाहबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:58 PM
वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मातंग समाजाचा सामुहिक विवाह सोहळामोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी २१ जोडपी विवाहबध्द झालीत.
ठळक मुद्देसामुहिक विवाह सोहळा हा समाज कल्याण कार्यालयाचे विशेष सहाय्याने व त्यांच्यामार्फत राबविण्यात आला. यावेळी २१ जोडपी विवाहबध्द झालीत.यावेळी जवळपास तीन हजारापर्यंत समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली.