शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

बनावट लग्न लावणाऱ्या टोळीची मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:43 AM

वाशिम : अलीकडच्या काळात काही ठराविक समाजात लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेत नवरदेव ...

वाशिम : अलीकडच्या काळात काही ठराविक समाजात लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेत नवरदेव मुलांना फसवून त्यांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पसार करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीची मुख्य सूत्रधार महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन परिसर, वाशिम) असे महिलेचे नाव आहे.

पैसे घेऊन लग्न लावण्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रत्येक जिल्ह्यात सुळसुळाट आहे. यासंबंधीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून त्याच्या माध्यमातून टोळीशी संपर्क साधला. त्यांना लग्नासाठी मुलगी हवी आहे, अशी बतावणी करून देवगाव फाटा (जि. औरंगाबाद) येथील हॉटेल पद्मावतीजवळ लग्नाच्या बोलणीकरिता २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता बोलावण्यात आले. यावेळी टोळीला पकडण्यासाठी हॉटेल पद्मावतीच्या बाहेर साध्या वेशात पोलिसांनी सापळा रचला. बोलणीप्रमाणे हॉटेल पद्मावतीसमोर एम.एच. १५ ई.ई. ०२५६ या वाहनातून तीन महिला व एक पुरुष असे हॉटेल पद्मावतीसमोर उतरून उभे राहिले. खबऱ्याने साध्या वेशातील पोलिसांना टोळीबाबत इशारा देताच पोलिसांनी या सर्व व्यक्तींवर एकदम झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

या टोळीची सखोल चौकशी केली असता टोळीची मुख्य सूत्रधार आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन, वाशिम) ही महिला असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यासोबत लग्नाकरिता आलेली मुलगी नामे कल्पना सुधाकर पाटील (रा. कासगाव, मुंबई) त्यांचे सोबती, सविता चंद्रकला कुलकर्णी (रा. नाशिक) व नीलेश दिलीप पाटील (रा. नाशिक) असे लोक आढळून आले. या टोळीतील आरोपींकडून सात मोबाईल फोन, सात बनावट आधार कार्डसह एक इंडिका कार असा एकूण ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

........................

बॉक्स :

मोबाईलने उलगडले बनावट विवाहाचे रहस्य

या टोळीतील मुख्य आरोपी असलेली वाशिम येथील आशा खडसे हिची सखोल चौकशी केली असता, तिच्या मोबाईलमध्ये एकाच महिलेचे अनेकांशी विवाह केल्याचे फोटो आढळून आले. ही टोळी प्रामुख्याने एजंटच्या माध्यमातून लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेऊन त्यांना हेरते व बोलणी करून मुलीचे आई, वडील, मावशी बनून लवकरात लवकर लग्न करायचे सांगतात.

....................

अडीच लाखाने केली फसवणूक

बनावट लग्न लावून देणाऱ्या या टोळीने शिल्लेगाव पोलीस स्टेशन (जि. औरंगाबाद) अंतर्गत असलेल्या माळी वडगाव येथील एका व्यक्तीकडून दोन लाख पन्नास हजार रुपये घेऊन लग्न लावून दिले होते. लग्नानंतर साधारण पाच दिवसांनी यातील वधूने लग्नात मिळालेले ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेला आहे. त्याचाही उलगडा लवकरच होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे नाशिक, जळगाव, औरंगाबाद यासह गुजरात राज्यात बनावट लग्न लावून पैसे उकळून फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे.