मुला-मुलींना सुसंस्कार घडावेत, कुटुंबात स्नेहभाव दृढ व्हावा हा उद्देश समाेर ठेऊन कुटुंब स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. यावेळी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे सतीश हिवरकर यांनी देव, देश व धर्म टिकवण्यासाठी पाल्यावर संस्कार करणे पालकांची जबाबदारी आहे, याची जाणीव करून दिली. योग वेदांत समितीचे प्रेमसिंग राठोड, किसन जाधव यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करणाऱ्यांना आठवण करून दिली की, १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ आणि ज्येष्ठांचा वंदन-पूजन करण्याचा दिवस आहे. कुटुंब मेळाव्यादरम्यान दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. उपस्थित सर्व माता-पित्यांचे दुर्गा वाहिनीच्या मुला-मुलींनी ईश्वर मानून पूजन केले. भारतमातेची आरती करून प्रसाद ग्रहण करण्यात आला. कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या कार्यक्रमाचे प्रास्तावित किसन जाधव तर सूत्रसंचलन दुर्गा वाहिनीच्या दीक्षा, भक्ती तर आभार संयोजिका पुष्पलता अफुणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दुर्गा वाहिनी मातृशक्ती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, योग वेदांत समिती आणि अंबिकानगर, पंचायत समिती कॉलनी परिसरातील सदस्यांनी प्रयत्न केले. यावेळी आशिष कोठारी, सागर चुंबळकर, मुकेश ठाकूर, दुष्यंत जोगी, देवेंद्र नांदुरकर, प्रवीण गोरे, लक्ष्मण सोळंके, राजेंद्र जोशी, आदित्य देशमुख, गजानन भोयर, नर्मदा गोटे, आशा देव, सूचना पुणे, अंजली पाठक, संगीता जयस्वाल, करूना कल्ले, अनिता काकडे, वृषाली पाटील, अलका लांडगे, प्रगती बांडे, स्वाती कदम, दीपाली देशमुख, मंजूषा जोशी, वंदना जाधव, भाटी, स्वाती मुठाळ, ज्योती कव्हर, कांता बोरकर आदींची उपस्थिती लाभली.
दुर्गा वाहिनी व योग वेदांत समितीतर्फे मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:42 AM