अध्यक्षस्थानी भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, तर प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभागप्रमुख भास्करराव बेंगाळ, समन्वयक डाॅ. माधव हिवाळे, मंगेश जरीले, प्रकाश पाटील शिंदे, अभय घुगे, रामेश्वर अवचार, उत्तमराव आरू, रवींद्र चोपडे, राजू डांगे, भीमराव खोडके, शंकरराव मुंडे, विकास झुंगरे, विजय सावके, रामेश्वर बोरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्रचे पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महिला स्पर्धकांनी अतिशय चांगला प्रतिसाद स्पर्धेला दिला होता. या बैठकीत स्पर्धेचा ऑनलाइन निकाल घोषित करण्यात आला. बक्षिसे व प्रमाणपत्रांचे तत्काळ वितरण करण्यात आो.
बैठकीत राज्यातील २०२१ मधील खरीप पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यासाठी व पीककर्ज वाटपातील दोष दूर करण्यासाठी भूमिपुत्रकडून पुन्हा एकदा राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. तसेच काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीत कोरोनामध्ये मृत पावलेल्या भूमिपूत्रशी संबंधितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीसाठी संतोष सुर्वे, नागेश इंगोले, संजय सदार, ज्ञानदेव भुतेकर, शंकर हुबांड, कपिल भालेराव, सुधाकर धोंगडे, गजानन जाधव, विकास पाटील, रवि जाधव, डाॅ. अमोल अवताडे, जगन अवचार, शत्रुघ्न पाटील, संतोष गव्हणे, भागवत गोटे, शिवाजी वाटाणे, गजानन पाटील सदार, सीताराम इंगोले, अर्जुनराव तुरूकमाने, पवन खोंडकर, बालाजी बिल्लारी, शिवराजण्णा कुबडे, रजनिश खोडकर सह मोठ्या प्रमाणावर पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यातील भूमिपुत्रचे पदाधिकारी उपस्थित होते.