लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन करण्यात आले. मालेगाव येथे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्रामगृह येथे शेतकरी बांधवांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीकडुन ओयोजित जन आक्रोश मोर्चा अमरावती संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अमित झनक यांनी सरकार शेतकरी, शेतमजूर,छोटे उद्योजक,आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत जाणीवपूर्वक आंधळेपणा आणि बहिरेपणाच सोंग घेत आहे.तरी सरकारच्या कानठळ्या उघडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून आयोजित आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मालेगाव काँग्रेस कमेटी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली माय- बाप शेतकरी बांधवांच्या या सरकार कडून होत असलेल्या पिळवणूकी बद्दल सरकार विरोधात रोष व्यक्त करत प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्याची तयारी बाबत माहिती दिली.या ठिकाणी काही शेतकरी बांधवांनी सरकार विरोधात आपले रोष व्यक्त करत निषेध व्यक्त केला. यावेळी मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच जगदीश बळी , नंदू अनसिंगकर, सय्यद गुलाब, सुभाष वाझुळकर, किसन घुग,े लक्ष्मण जाधव , उत्तम सरनाईक, सुरेश शिंदे ,शशि टनमने ,अमोल लहान,े घोड़े , रेहान चौधरी, रामदास अवचार यांच्यासह तालुका काँग्रेस व विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसची मालेगाव येथे सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:33 PM
मालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन करण्यात आले.
ठळक मुद्देमोर्चा संदर्भात नियोजन सभेस कार्यकर्त्यांचा प्रतिसाद