सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. के. एन. साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव रनबावळे, आनंदराव ताकतोडे, पं. स. सदस्य रविभाऊ आढाव, ज्ञानेश्वर बाजड, पं. स. सदस्य महीपती इंगळे, बाला रत्नपारखी हाेते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव जोगदंड उपस्थित होते. सर्वप्रथम लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव जोगदंड यांनी केले . प्रास्ताविकातून लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे धेय, धोरण, भविष्यकाळात करावयाचा कृती कार्यक्रम निश्चित करून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची निश्चित दिशा आदी बाबतीत सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमामध्ये बबनराव इंगळे, डॉ. भीमराव साठे, एम.टी.काबळे, माधवराव रनबावळे,. एस. जी. कांबळे, पुंडलिक गवळी यांनी विचार मांडलेत. कार्यक्रमास प्रकाश थोरात, मारोती पारवे, प्रताप साबळे, धीरज साबळे, एस. पी. कांबळे, बी. एन. खंदारे, दशरथ कांबळे, सुखदेव कांबळे, बबनराव इंगळे, सुनील दाभाडे, मनोज थोरात, आनंदराव ताकतोडे, के. एच. मानवतकर, रमेश कांबळे, माधवराव रनबावळे आदींची उपस्थिती हाेती.
310821\img-20210829-wa0398.jpg
लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सभा