यावेळी मानोरा तहसीलदार शारदा जाधव यांनी व्यापारी असोसिएशनकडून कोरोना चाचणीकरिता चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाची लस घेण्याकरिता जनजागृती करण्याची आवश्यकता आहे . जेणे करुन लस कुठे मिळते, आणि ४५ वर्ष पर्यंतच्या लोकांना ज्यांना मधुमेह किंवा ब्लडप्रेशरचा आजार असेल अश्या लोकांना ही लस सरकारी रुग्णालय मानोरा येथे सरकारकडून मोफत दिल्या जाते आणि ६० वर्षावरील लोकांना सुद्धा ही लस मोफत दिल्या जाते ही माहिती सर्वसामान्य लोकांना व्ह्यावी या करिता जनजागृती आवश्यक असल्याचे तहसीलदार शारदा जाधव यांनी व्यापारी अशोशियनच्या सभेमध्ये सांगितले. याकरिता व्यापारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे जेणे करूण लससंदर्भात नागरिकांच्या मनातील भीती निघेल. सभेमध्ये मानोरा नगर पंचायतचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड, नायब तहसीलदार संदेश किर्दक, मानोरा व्यापारी अशोशियनचे अध्यक्ष राजू गुल्हाने, उपाध्यक्ष श्याम हेड़ा,पदाधिकारी कादर लंघा ,संजय जाधव, असलम पोपटे, वहीदोद्दीन शेख, अमोल राऊत, राजेश शाहने आदि उपस्थित होते.
मानाेरा येथे व्यापारी असाेशिएशनची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:41 AM