लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त यांच्यावतीने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन सन २०१९-२० या सत्रात केले जाणार आहे. तालुकास्तरावर १० खेळांचे आयोजन व नियोजन करण्याकरिता तहसीलदार तथा कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाल्यानंतर क्रीडा स्पर्धांची धूम सुरू होते. यावर्षी तालुकास्तरावर १० क्रीडा स्पर्धा, खेळांचे आयोजन व नियोजन केले जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय सभा घेतल्या जाणार आहेत. १८ जुलै रोजी मालेगाव येथे, त्यानंतर त्याच दिवशी रिसोड येथे सभा होणार आहे. १९ जुलै रोजी मानोरा येथे, त्यानंतर कारंजा येथे सभा होणार आहे. २० जुलै रोजी वाशिम येथे आणि त्यानंतर शेलूबाजार येथे सभा होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे या सभेस तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शारीरिक शिक्षक, सहशिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी तालुकानिहाय सभांची धूम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 2:58 PM