वाशिम, दि. २८- जिल्हयातील सर्व सात - बारा धारक शेतकर्यांना सेवा सहकारी सोसायटीचे सभासद करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अँक्शन प्लॅन आखला आहे. तालुकास्तरिय चमू जाहीर करुन लवकरचं सर्व शेतकर्यांना सोसायटीचे सभासदत्व दिले जाणार आहे.अर्थव्यवस्थेला बळकटी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यात सहकारी संस्थांची मोलाची भूमिका आहे. शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून गावपातळीवर सेवा सहकारी सोसायट्या स्थापन केल्या जातात. वाशिम जिल्ह्यात ४२४ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. या सोसायटीचे सभासदत्व होण्यासाठी काही अटी असून, अनेक सा त-बारा धारक शेतकरी अद्याप सोसायटीचे सभासद झाले नाहीत. परिणामी, सेवा सहकारी सोसायटी निवडणुक न मतदानात भाग न घेणे, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ न मिळणे आदी सुविधांपासून शेतकर्यांना वंचित राहावे लागते. पीककर्ज मिळण्यातदेखील काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात. या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व सात-बारा धारक शेतकर्यांना सेवा सहकारी सोसायटीचे सभासदत्व देण्यासाठी ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला आहे. ह्यअँक्शन प्लॅनह्णच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहिम राबविली जाणार असून, तालुकास्तरावर चमूचे गठणही केले आहे. वाशिम जिल्हय़ातील सर्व पात्र खातेदार शेतकर्यांना सेवा सहकारी सोसायटीचे सभासद करुन घेण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार पहिला टप्प्यात या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची गावपातळीवर जनजागृती केली जाणार आहे. गावस्तरावर सभा घेणे, भिंती पत्रकाद्वारे व गावस्तरावर दवंडी देवून जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी तालुका सहाय्यक निबंधकांना दिल्या आहेत. सहकारी संस्थांचे तालुका सहायक निबंधक आणि त्यांचे अधिनस्त क्षेत्रीय अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्तरावर मेळावे घेण्यात येणार आहेत. यावेळी पात्र ७/१२ धारक खातेदार शेतकर्यांना सभासद करुन घेण्यात येणार आहेत. सभासदत्वासाठी अर्ज करणार्या व्यक्तीचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील खातेदार असावा, त्याच्या नावावर किमान १0 आर. क्षेत्र शे तजमीनीचा सात-बारा असणे आवश्यक आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हय़ातील प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील खातेदारांनी संस्थेकडे अर्ज दाखल करावा. यानंतर संस्थेचे सभासदत्व दिले जाणार आहे. संबंधित सेवा सहकारी संस्थेने सभासदत्व देण्याचे नाकारल्यास तत्काळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 चे कलम २३ नुसार सहाय्यक निबंधक यांचेकडे सभासदत्व मिळणेबाबत अपिलाची तरतुद उपलब्ध असल्याचे ज्ञानेश्वर खाडे यांनी सांगितले.
सर्व शेतक-यांना मिळणार सहकारी सोसायटीचे सभासदत्व
By admin | Published: September 29, 2016 1:30 AM