लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बाल गणेश मंडळाने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले असून, याद्वारे ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला जाणार आहे.मागील वर्षी सलग दहा दिवस विविध उपक्रम राबवून या मंडळाने विविध पुरस्कार पटकावले होते. यावर्षी शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, बेटी बचाव, नेत्रदान आदी विषयांवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात महिला व बालकांनी पुढाकार घेतला आहे. महिलांसाठी विविध स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या गणेशमंडपामध्ये प्रत्येकाला आई पाहिजे, बायको पाहिजे, बहिण पाहीजे, मग मुलगी का नाही, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, बेटी है तो कल है, पर्यावरणाचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा, शेतकरी राजा धीर धर, संकटावर मात कर, आत्महत्या करु नको यासोबतच रक्तदान, नेत्रदान बाबत बॅनर लावण्यात आले आहेत. गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, व्यसनमुक्ती कार्यशाळा, बेटी बचाव कार्यशाळा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत आदी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. याशिवाय भजन स्पर्धा, बालकांसाठी चित्रकला स्पर्धा, नृत्यस्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी अॅड. भारती निलेश सोमाणी यांनी दिली.
गणेश मंडळाद्वारे ‘बेटी बचाओ’चा संदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 7:27 PM
स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बाल गणेश मंडळाने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले असून, याद्वारे ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला जाणार आहे.
ठळक मुद्देलाखाळा परिसरातील जानकीनगर बाल गणेश मंडळा दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन