ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 17 : राज्यातील लहान जिल्हयात गणल्या जाणाऱ्या वाशिम जिल्हयात ह्यमेट्रो सिटीह्णत होत असलेल्या हायटेक प्रचाराची क्रेझ नगरपालीका निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिमात पोहचली असून जिल्हावासियांचे लक्ष वेधून घेत आहे.येत्या २७ नोव्हेंबर रोजी जिल्हयातील वाशिम, मंगरुळपीर व कारंजा नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दिग्गज उमेदवार आमने-सामने असल्याने एकमेकांवर कुरघोडी करीत हायटेक प्रचाराला पंसती दिल्या जात आहे.
जिल्हयात प्रथमच निवडणुकीत राजकीय पक्षांच्यावतिने उमेदवारांच्या प्रचारार्थ रथ, एकसारखी प्रचाराची वाहने, शहराच्या चोहोबाजुला भव्य असे बलून, वाहनांवर भव्य एलईडी स्क्रिन, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोक्यांवर एक सारख्या टोप्या, छाप्या, हातात ब्रासलेट यासह विविध प्रचाराचे साहित्य दिसून येत आहे. तसेच निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे शहरातील ईमारतींवर भव्य असे कटआऊट जणू वाशिमवासियांना मेट्रो सिटीत असल्याचा भास होत आहे. एकमेकांसमोर उभे असलेल्या दिग्गज उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत आली आहे .