..................
वाशिम शहरातील बाजारपेठेत गर्दी
वाशिम : रविवार, २८ मार्च रोजी होळी हा सण असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत शनिवारी विविध साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात असल्याचेही दिसून आले.
...............
शहर स्वच्छतेकडे न.प.चे विशेष लक्ष
वाशिम : शहरातील विविध प्रभागांमधील कचरा नियमित उचलून नेण्यासह सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे न.प.ने विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शनिवारी आययूडीपी काॅलनीत स्वच्छता करण्यात आली.
...............
थकबाकी अदा करण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा व विद्युत पथदिव्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ही रक्कम अदा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले आहे.
..............
जिल्ह्यातील दुकानांची तपासणी
वाशिम : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून शुक्रवार, २६ मार्चपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.