सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ात एकमेव वाशिम येथे शासकीय दूध संकलन केंद्र सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी दूध उत्पादक संघांकडून पाठविल्या जाणार्या दुधाच्या प्रमाणावर सक्तीने र्मयादा लादण्यात आली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटर दूध स्वीकारले जात आहे. यामुळे मात्र उर्वरित हजारो लीटर दुधाची खासगी दूध संकलन केंद्रांवर अल्पदरात विक्री करावी लागत असल्याने दूध उत्पादक संघांसोबतच पशुपालकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.वाशिम येथील शासकीय दूध संकलन केंद्रांवर साधारणत: २ वर्षांपूर्वी दैनंदिन ६ हजार लीटर दूध स्वीकारले जायचे; मात्र मुंबईवरून दुधाची मागणी घटल्याचे कारण समोर करून अकोला येथील शासकीय दूध संकलन केंद्राने सद्य:स्थितीत वाशिम जिल्हय़ातून पाठविल्या जाणार्या दुधावरही र्मयादा लादली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटरच दूध पाठवावे, अशा सूचना दिल्याने वाशिमच्या दूध संकलन केंद्राने जिल्हय़ातील ग्रामीण भागात कार्यरत १४ दूध उत्पादक संस्थांना १0 लीटरपासून २00 लीटरची र्मयादा घालून देत त्याच प्रमाणात दूध स्वीकारणे सुरू केले आहे. याव्यतिरिक्त नव्याने कुठलीच संस्था अथवा तालुका दूध उत्पादक संघाकडून दूध स्वीकारले जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मात्र हजारो लीटर दुधाची खासगी दूध संकलन केंद्रांवर अथवा शहरी भागातील नागरी वसाहतींमध्ये मिळेल त्या दरात विक्री करावी लागत असल्याने पशुपालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.
शिरपूर परिसरातील ११ गावांमधून दैनंदिन ४ हजार लीटर दुधाची आवकजिल्हय़ातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) परिसरातील शिरपूर, वाघी, खंडाळा, बोराळा, ढोरखेडा, शेलगांव, एकांबा, वसारी, किन्ही, घाटा, मिर्झापूर या ११ गावांमधून दैनंदिन ४ हजार लीटर दूध शिरपूरच्या गजानन दूध उत्पादक संघाकडे पाठविले जाते; मात्र त्यापैकी केवळ २00 लीटर दूध वाशिमच्या शासकीय दूध संकलन केंद्राकडून स्वीकारले जात असून, उर्वरित दुधाची अल्प दरात बाजारपेठेत विक्री करावी लागत असल्याची माहिती संघाचे अभिमान उल्हामाले यांनी ‘लोकमत’ला दिली.
वाशिमच्या दूध संकलन केंद्रावर दैनंदिन केवळ १२00 लीटरच्या र्मयादेत दूध स्वीकारून ते अकोला येथील संकलन केंद्राकडे पाठविण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत. त्यानुसार, जिल्हय़ातील १४ दूध उत्पादक संघांकडून १0 ते २00 लीटरच्या प्रमाणात दूध स्वीकारले जात आहे. - वाय.एस. चौधरीकेंद्रप्रमुख, शासकीय दूध संकलन केंद्र, वाशिम