वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सेवा ध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री येत आहे. ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असुन या सोहळ्यास बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा समाजाला आमंत्रित करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे बुलढाणा जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांनी यावेळी बुलढाणा येथील सुंदरखेड येथील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. तसेच या ठिकाणी सह विचार मेळावा घेऊन बंजारा समाजातील नागरिकांना सोहळ्याचे निमंत्रित केले आहे.
संजय राठोड सेवाध्वज सोहळ्यासाठी बंजारा समाजाला आमंत्रित करण्यासाठी बुलढाण्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 3:57 PM