वाशिम : कृषी व पणन राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन हरभरा व तुर पिकांची पाहणी २३ डिसेंबर रोेजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या सत्काराचे नियोजन केला असता त्यांनी सत्कार न स्विकारता स्वत: शेतकऱ्यांचा सत्कार करुन सन्मान केला.
२३ डिसेंबर रोजी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत वाशिम जिल्ह्याचा दौऱ्यामध्ये कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड येत असतांनी रस्त्यामध्ये कळंबा महाली व कासोळाच्या शेत शिवारात जावून पिकांची पाहणी केली. यामध्ये वासुदेव महल्ले, विठलराव महल्ले, सुनिर्ता महल्ले या शेतकऱ्यांसोबत पीक परिस्थितील व अडचणींवर चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणुन घेवुन ताबडतोब कृषी अधिक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांना अडीअडचणीसंदर्भात सुचना सुध्दा केल्यात. विशेष म्हणजे मंत्री महोदयांनी स्वताचा सत्कार टाळुन वासुदेव महल्ले, विठ्ठलराव महल्ले ,व सुनिता, महल्ले यांचा शाल , श्रीफळ व गुलदस्ता देवुन सत्कार केला. यावेळी आमदार लखन मलीक ,भाजपा उपजिल्हाध्यक्ष लखनसिंह ठाकुर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.