लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम ब्राम्हणवाडा येथे एका अल्पवयीन मुलावर गावातीलच दोन अल्पवयीन मुलांनीच गत दोन वर्षांपासून अनैसर्र्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ६ जून रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.यामध्ये पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की, गावातीलच दोन अल्पवयीन मुलांनी मागील दोन वर्षांपासून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलाचे अनैसर्र्गिकरीत्या शोषण केल्याची बाब लक्षात आली. याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्र्यादी महिला अल्पवयीन आरोपींच्या घरी गेली असता फिर्यादीस मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. अशा फिर्यादीवरून वरील दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध कलम ३७७, ३२३, ५०४, ५०६, सहकलम ४ पास्कोनुसार गुन्हा दाखल करुन दोघांची रवानगी बाल न्यायालयात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. यू.जमधाडे करीत आहेत.
अल्पवयीन मुलावर अल्पवयीन मुलांचाच अनैसर्गिक अत्याचार
By admin | Published: June 08, 2017 2:14 AM