वाशिम : स्थानिक सिंधी कॅम्प परिसरातील एका व्यावसायिकाने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांत पिरु उर्फ प्रकाश बसंतवाणी (५०) याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३५४ सहकलम ८/१२ ‘पोक्सो’ (बाल लैंगिक अत्याचार) अॅक्टनुसार गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार सिंधी कॅम्प परिसरातील एका व्यावसायीकाने त्याच परिसरातील एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस गुरूवार १७ सप्टेबर रोजी दुपारी ४.३० चे सुमारास आपल्या मोटरसायकलवर एक कि़मी. अंतरावर असलेल्या निर्जन स्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी तिचा त्याने विनयभंग केला. त्यानंतर पिडीत मुलीस परत तीच्या घराजवळ सोडून दिले.सदर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई - वडीलाकडे लगेच कथन केला . या संदर्भात गुरूवारी रात्री पिडीत मुलीच्या पालकांनी शहर पोलीसात फिर्याद नोंदविली. शहर पोलीसांनी पिरू उर्फ प्रकाश बसंतवाणी ( वय ५० ) याचेविरुध्द भादवी कलम ३६३ , ३५४ सहकलम ८/१२ ‘पोक्सो’ अॅक्टनुसार (बाल लैंगीक अत्याचार) गुन्हा दाखल केलाघटनेच्या कारणावरून दोन गटांत हाणामारीउपरोक्त कारणावरून गुरूवारला सांयकाळी ५ वाजताचे सुमारास फिर्यांदी व आरोपीकडील दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. यामध्ये आरोपीला जमावाने चांगलाच चोप दिला. ही हाणामारी जुन्या जि.प. समोरील एका खाजगी दवाखान्यामागे झाली. यावेळी घटनास्थळावर शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची वार्ता अवघ्या तासाभरात शहरात वेगाने पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.
अल्पवयीन मुलीचा व्यापाऱ्याने केला विनयभंग; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:37 PM