बद्रीनारायण घुगे / मांडवा ( वाशिम)तत्कालीन जिल्हाधिकारी उदय राठोड यांनी जिल्हय़ात राबविलेल्या लोकसहभागातून ग्रामविकास या उपक्रमात जिल्हय़ातील जास्त आत्महत्या झालेल्या प्रत्येक तालुक्यातील दोन गावे अशा १२ गावांची निवड केली होती व गावाचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हे आश्वासन हवेतच विरून गेले. महसूल विभागाच्या अधिकार्यांनी निवड झालेल्या गावात जाऊन मार्गदर्शन केले. शेतकर्यांच्या जमिनीचे मोफत माती परीक्षण करू, दुग्ध व्यवसाय व अन्य जोडधंदे करण्यासाठी कर्ज मिळवून देऊ, महिलासाठी सार्वजनिक शौचालय बांधू यासह अनेक घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात अडचणीत असणार्या शेतकर्यांना काहीच मिळाले नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी राठोड यांनी मांडवा गाव आपण दत्तक घेतले असून, या गावात सर्वांगीण विकास करू, असे सांगितले होते.त्यावेळी त्यांनी गावात दारुबंदी, व्यसनमुक्ती आदी विषयावर मार्गदर्शन करताना आपण काहीही द्यायला आलो नसून, गावकर्यांची वाईट व्यसने सोडविण्यासाठी आलो असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर तीन-चार वेळा गावात जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी आले, त्यांनीही सभामध्ये जिल्हाधिकारी राठोड यांच्या प्रमाणेच त्या अधिकार्यांनी आश्वासनाचा व घोषणाचा पाऊस पाडला. गावात शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून, त्यामुळे पुढे निश्चितचपणे शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील, असा आशावाद व्यक्त केला होता; मात्र शासनाने शेतकर्यांसाठी जोडधंदे व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी शासकीय स्तरावरून कसलेही प्रयत्न केले नाही. मांडवा व लोणी खु. गावातील शेतकर्यांच्या शेतातील बांधावार त्या शेतीतील माती परीक्षणसुद्धा करण्यात आले नसल्याने सदर उपक्रम शेतकर्यांसाठी मृगजळ ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.लोकसहभागातून ग्रामविकास या उपक्रमात ज्या गावांची निवड झाली त्या गावात जाऊन मार्गदर्शन करणार असल्याचे रिसोड तालुक्याचे तहसीलदार अमोलकुमार कुंभार तहसीलदार यांनी स्पष्ट के ले.
शासकीय उपक्रम शेतक-यांसाठी ठरला मृगजळ
By admin | Published: January 13, 2015 1:03 AM