शिरपूर जैन : येथुन २ कि़मी. अंतरावर होवु घातलेल्या मिर्झापुर लघु सिंचन प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यात पुर्ण होणार असुन ६१० हेक्टर परिसरातील शेतजमीन सिंचनाखाली येणार.
२००५ -०६ पासुन विविध कारणाने प्रलंबीत पडलेल्या मिर्झापुर लघु सिंचना प्रकल्पाचे काम दोन महिन्यात पुर्ण होणार असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली. या प्रकल्पासाठी २१० हेक्टर शेत जमीन अधिग्रहण करण्यात आली. मधल्या काळात पांगरखेडा पुर्नवसन, मिर्झापुर घाटा या गावाच्या पर्यायी रस्त्यासाठी तेथील लोकांीनी विरोध केल्याने सतत काम रखडले होते. परिणामता प्रकल्पाची किंमतही वाढली. या वाढीव किंमतीसाठी पुन्हाा शासनाकडे सुधारीत मान्यता मिळविण्यासाठी वेळ लागला. आता मुख्य अडथळा असलेल्या पांगरखेडा चांडस रस्त्यावर पुलही बनविण्यात आला. तर मिर्झापुर घाटा या गावाच्या पर्यायी रस्त्यासाठी किन्ही घोडमोड गावातुन रस्ता न करता इृ क्लास जमीनीमधुन शिरपुरला जोडणारा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी व प्रकल्पाच्या कामासाठी प्रर्याप्त निधी उपलब्ध असुन येत्या दोन महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे परिसरातील ६१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करुन शेतकºयाना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळवुन देण्यासाठी मी आमदार या नात्याने प्रयत्न केले.
- आ.अमित झनक, रिसोड मालेगाव विधानसभा
प्रकल्पासाठी अडचणीचे ठरणारे सारे मुद्दे निकाली निघाले असुन पर्यायी रस्ते व प्रकल्पाच्या कामासाठी निधीही प्राप्त आहे. येत्या दोन महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
- गणेश हासे, सहाय्यक अभियंता ल.पा.बंधारे वाशिम