शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महिला वाहकाची सतर्कता; हरविलेल्या चिमुकल्याची माता-पित्याशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:55 AM

Washim News : वीर गजानन चव्हाण (०३) असे चिमुकल्याचे नाव असून, गायत्री डोंगरे या  महिला वाहक आहेत. 

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चुकीने बसमध्ये चढल्याने मातापित्यापासून कायमचा दुरावण्याचा प्रसंग ओढवलेल्या चिमुकल्याची महिला वाहकाच्या सर्तकतेने अवघ्या दोनच तासांत पुनर्भेट झाली. वीर गजानन चव्हाण (०३) असे चिमुकल्याचे नाव असून, गायत्री डोंगरे या  महिला वाहक आहेत. कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा वीर गजानन चव्हाण (०३) हा फलाटावर खेळत खेळत कारंजा आगाराच्या एमएच-०६ एक्यू-९४२० क्रमांकाच्या वाशिमकडे जाणाऱ्या बसमध्ये चढला. तो बसमध्ये सर्वात मागच्या आसनावर बसला. ही बाब त्याच्या मातापित्याच्या लक्षात येण्यापूर्वीच बस वाशिमकडे रवाना झाली. बसमधील वाहक गायत्री डोंगरे आणि चालक एस. एम. खानबरड यांनाही बसमध्ये मुलगा चढल्याचे दिसले नव्हते. बस धावू लागल्यानंतर वीरला त्याचे आईवडील दिसले नाही. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. बस धानोरा खु. येथे थांबल्यानंतर तो रडत रडत खाली उतरू लागला. त्यावेळी गायत्री  डोंगरे यांच्या मनात शंका आली. त्यांनी वीरबाबत प्रवाशांकडे चौकशी केली. त्यावेळी खाली उतरणाऱ्या आणि बसमधील प्रवाशांनीही तो आपल्यासोबत नसल्याचे सांगितले. गायत्री यांनी विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव वीर असल्याचे सांगितले. त्यामुळे गायत्री डाेंगरे यांनी त्याला सोबतच ठेवले. पोलिसांना याची कल्पना देण्याचा त्यांचा विचार होता. दरम्यान, मुलगा न  दिसल्याने वीरचे मातापिता घाबरले आणि त्यांनी चौकशी कक्षात धाव घेत माहिती दिली. काही वेळानेच गायत्री डोंगरे यांनाही ही माहिती मिळाली आणि त्यांनी मंगरुळपीर बसस्थानकावर वीरला पुन्हा त्याच्या मातापित्याच्या हवाली केले.  

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी