आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:54 PM2018-07-27T12:54:31+5:302018-07-27T12:56:13+5:30

काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे.

MLA Amit Jhanak resigned to the Assembly Speaker | आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा 

आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा 

Next
ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाºयांनी आपापल्या पदांच्या राजीनाम्याची फाईल तयार करून ती सामूहिकरित्या सादर करण्याची तयारी चालविली आहे. अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा समाजास आरक्षण लागू करण्याच्या मुख्य मागणीवरून संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपातील आंदोलने होत आहेत. त्याची धग वाशिम जिल्ह्यातही कायम असून याच मुद्यावरून काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे. यासोबतच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शेकडो पदाधिकाºयांनीही आपापल्या पदांचे राजीनामे लिहून ठेवले असून ते सामूहिकरित्या तथा कायद्यातील तरतूदीनुसार सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील इतर कुठल्याही समाजाला यापूर्वी मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, शासकीय यंत्रणेवर दबाव वाढविण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आमदारांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मराठा समाजाच्या पदाधिकाºयांनी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत आमदार अमीत झनक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाºयांनी आपापल्या पदांच्या राजीनाम्याची फाईल तयार करून ती सामूहिकरित्या सादर करण्याची तयारी चालविली आहे. 

जिल्ह्यातील समस्त मराठा समाजाच्या भावनांना आदर ठेवून आपण आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा, अशी आपली देखील धारणा आहे.
- अमीत झनक, आमदार, रिसोड विधानसभा मतदारसंघ

Web Title: MLA Amit Jhanak resigned to the Assembly Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.