शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आमदारांनी घेतला सुजलाम, सुफलाम अभियानाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 5:56 PM

कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला. जलसंधारणाची ही चळवळ आपली समजून या कामाला गती द्यावी, अशा सूचना पाटणी यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.भारतीय जैन संघटना व जलसंधारण विभागा यांच्यावतीने जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा या हेतूने जिल्हयात १३ पोकलन व २८ जेसीबी कार्यरत आहे. त्यापैकी मानोरा व कारंजा तालुक्यात ४  पोकलन व ९ जेसीबी कार्यरत असून या कामाला गती यावी या हेतूने आमदार पाटणी यांनी कामाचा आढावा घेतला. कामाअभावी कोणतीही मशीन उभी राहू नये यासंदर्भात संबधित यंत्रनेला जबाबदार पकडण्यात येईल. भारतीलय जैन संघटना मोफत मशीन देउन जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याकरीता आपला सहभाग असणे गरजेचे आहे, असेही पाटणी म्हणाले. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी ही आपली चळवळ समजून या कामात मदत केली  पाहीजे असे मत व्यक्त केले. याप्र्रंसगी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, जि.प. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि.बी.गहेरवार व उपकार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, शाखा अभियंता अब्दुल सईद, राठोड, कारंजा तहसिलदार रणजीत भोसले, मानोरा तहसिलदार डॉ.सुनिल चव्हान, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, समाधान पडघान, भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे,  तसेच सुजलाम सुफलाम अभियानाचे जिल्हा निरीक्षक अभिलास नारोडे, तालुका समन्वयक अक्षय सेलसुलकर, भारतीय जैन संघटनेचे प्रफुल बानगावकर यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRajendra Patniराजेंद्र पाटणी