टाळेबंदी कालावधीतील नागरिकांना भरमसाठ आलेली वीजबिले माफ करून दिलासा देण्यात यावा, या मागणीसाठी मनसेच्या वतीने सातत्याने निवेदने व आंदोलन करण्यात येत आहेत. २६ मार्च रोजी या संदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वीज नियामक आयोगाला देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. वीजबिल माफीसंदर्भात ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत यांनी कोरडे आश्वासन देऊन नंतर घूमजाव केले व लोकांकडून सक्तीने वीजबिल वसुलीचे आदेश दिले. या संदर्भात मनसेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात येऊन ३० मार्च रोजी महावितरणला वीजबिल माफीसाठी नागरिकांकडून सहकार्य म्हणून भीक मांगो आंदोलन राबविण्यात आले. या आंदोलनातून जमा झालेली ६५० रुपयांची रक्कम महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सुपुर्द करून रीतसर शासकीय पावती घेण्यात आली. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.
टाळेबंदीतील वीजबिल माफीसाठी मनसेचे भीक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:42 AM