वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्यावतीने ‘आयरॅड’ नावाच्या मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अंमलबजावणीत पोलीस, परिवहन, आरोग्य आणि रस्ते महामार्ग विभागाची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. वाशिम जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेच्या विजय पाटकर यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
.....................
जिल्ह्यातील रस्ते अपघात
२०१९-
रोड अपघात - ३४
जखमी - ६५
मृत्यू - १५
....................
२०२०-
रोड अपघात - १३
जखमी - ३२
मृत्यू - ८
................
२०२१-
रोड अपघात - १६
जखमी - ३८
मृत्यू - ३
...................
२०१९ मध्ये झालेले अपघात
३४
...........................
आतापर्यंत ६५ जणांना प्रशिक्षण
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १३ अधिकारी आणि ५२ कर्मचाऱ्यांना ‘ॲप’ हाताळण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ॲपमध्ये अपघाताची संपूर्ण माहिती, त्यासंबधी अहवाल अंतर्भूत असेल. अहवालाची जोडणी थेट सीसीटीएनएस आणि ऑनलाइन एफआयआरशी केली जाणार आहे. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
.....................
बॉक्स: आतापर्यंत ७० अपघातांची नोंद
एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास पोलीस अधिकारी येथे जाऊन ‘आयरॅड ॲप’मध्ये नोंद करीत आहेत. जर अपघात खड्ड्यांमुळे झाला असेल, तर बांधकाम विभागाकडे ॲपद्वारे सूचित करण्यात येणार आहे. वाहतूक नियम न पाळल्याने अपघात झाल्यावर आरटीओकडे नोंद पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत अशा ७० अपघातांच्या नोंदी ‘आयरॅड ॲप’वर वाहतूक पोलिसांनी घेतल्याची माहिती विजय पाटकर यांनी दिली.
.......................
असे चालणार काम
जिल्ह्यात दोन ग्रामीण पोलीस स्टेशन आणि इतर ११ पोलीस स्टेशन कार्यान्वित आहेत. त्यातील काही ठाण्यांमध्ये प्रकल्पाची रंगीत तालीम झाली. जिल्ह्यातील ६५ पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयरॅड ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यातील अपघातांची संपूर्ण माहिती व अहवाल या ॲपमुळे एनआयसीकडे जमा होणार आहे. त्यावर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.