या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सुविधा मिळत आहे. संबंधित गावातील रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, असे आवाहन जि.प. आरोग्य विभाग व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे. या फिरत्या वैद्यकीय पथकाचा कार्यक्रम उकर्डा व पारवा येथे ५ जुलै रोजी, दिघी व काकडशिवनी ६ जुलै मंगरूलपीर व डोंगरगाव ७ जुलै, पानगव्हाण ८ जुलै, चाकोली व धोडप खुर्द येथे ९ जुलै, तांदूळवाडी व भापूर १० जुलै, जवळा व कुऱ्हा १२ जुलै, पार्डीतिखे व हिवरापेन १३ जुलै, पेडगाव व खडकी ढंगारे १४ जुलै, खैरखेडा व भामटवाडी १५ जुलै, कुत्तरडोह व वाडी रामराव येथे १६ जुलै, धरमवाडी व वरदरी १७ जुलै, वाशीम तालुक्यातील फाळेगाव व दगडउमरा १९ जुलै, जांभरून महाली २९ जुलै, वाघोली खुर्द २३ जुलै, सावंगा व भोयता येथे २४ जुलै, नांदखेडा व तांदळी येथे २६ जुलै, सावरगाव, बोरव्हा व लखमापूर २७ जुलै, मोतसावंगा व शेगी येथे २८ जुलै आदी ठिकाणी नियाेजन करण्यात आले आहे.
मोबाइल मेडिकल युनिट गावभेट कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:51 AM