वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. दुसरीकडे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी किंवा मोबाईल क्रमांकावर द्यावी, असे आवाहन वाशिम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
विविध माध्यमातून ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस विभाग सरसावला असून, नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार नोंदवू शकतात.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना, वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक विजय पाटकर, वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, रिसोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, मालेगावचे पोलीस निरीक्षक एस. एच. नाईकनवरे, शिरपूरचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक आर. बी. जायभाये, अनसिंगचे पोलीस निरीक्षक गणेश भाले, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण साळवे, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक एम. एम. बोडखे, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे, मानोराचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळगणे, धनजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर मानकर या पोलीस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे असून गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक के. एच. धात्रक हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे हे सचिव आहेत. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले.