प्रकल्प अधिकारी मानोरा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना १० ऑगस्ट व १८ ऑगस्टला निवेदन देऊन अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते जुने झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो व त्यांच्या दुरस्तीकरिता खर्च येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो. दिलेला मोबाईल परत घ्यावा व नवीन चांगला मोबाईल द्यावा तसेच केंद्र सरकारने लादलेला पोषण ट्रॅकर ॲप हा सदोष असून तो रद्द करावा, मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता नियमित द्यावा व त्यामधे वाढ करावी, कर्मचाऱ्यांना अरिरिक्त प्रभार न देता रिक्त पदे भरावी आदी मागण्यांचे निवेदन दिले हाेते. मागण्या मान्य केल्या नाही तर १७ ऑगस्टपासून कधीही मोबाईल वापसी आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला हाेता , त्यानुसार आंदाेलन सुरू करण्यात आले. निवेदनावर प्रमिला उजवे, आर. वाय. इंगोले, शीला डेरे, शोभा भगत, भाग्यश्री डेरे, अन्तकला मनवर आदींच्या स्वाक्षरी आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे माेबाईल वापसी आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:46 AM