- दादाराव गायकवाडवाशिम: विविध संकटांमुळे शेतीपिकांना फटका बसून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. यातून मार्ग काढून शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. ते एका कार्यक्रमानिमित्त वाशिम येथे आले असता. शेतकºयांच्या समस्यांबाबत घेतलेली त्यांची ही मुलाखत
शेतकºयांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी काय विशेष उपाय करणार ?शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालास अधिकाधिक दर मिळावेत म्हणून उत्पादन ते विक्री या दरम्यानची साखळी कमी करून शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचे प्रयत्न आहेत. बाजारात ज्या शेतमालास मागणी आहे. तेच शेतकºयांनी पिकवावे, यावरही भर देण्यात येत आहे. त्यासाठीच विकेल ते पिकेल, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विदर्भात कपाशीचे घटत असलेले क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणार का?शेतकरी जे परवडेल, तेच पीक घेतो. सोयाबीन पीक शेतकºयांना फायद्याचे वाटत आहे. त्यामुळे इतर पिकांवर भर देण्यापेक्षा याच पिकाचे उत्पादन कसे वाढेल आणि शेतकºयांना कसा फायदा होईल, यावर भर देणे महत्त्वाचे आहे.
बियाणे न उगवल्याच्या प्रकारात कंपन्यावरील कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे दिसते, असे का ?यंदाच्या हंगामात शेतकºयांनी पेरलेले बियाणे न उगवल्याची विविध कारणे आहेत. त्यात अतिवृष्टी आणि पेरणीतील तांत्रिक दोषाचा समावेश असला तरी काही कंपन्यांचे बियाणेही निकृष्ट आढळले. त्यामुळेच ८० पेक्षा अधिक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाहणीतील निष्कर्षानुसारच कारवाई होत आहे.
वाशिम जिल्ह्यात कोणत्या फळलागवडीवर भर देण्याचा प्रयत्न आहे.?पूर्वी सिंचन विहिरी असलेल्यांनाच फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळत होता. आता शेततळेधारकांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यात संत्रा लागवडीसाठी खूप वाव आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना या संदर्भात सुचना देऊन संत्रा पिकाचे क्षेत्र वाढविण्यास सांगण्यात येणार आहे.
रब्बी हंगामाचे नियोजन काय ?राज्यात यंदा ६० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकºयांना लागणारे बियाणे, खते आदिंची उपलब्धता करण्यात येत असून, शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच कृषी विभागाचा अधिकाधिक भर राहणार आहे. कोणत्याही जिल्ह्यात खताचा तुटवडा भासू नये, म्हणून नियोजन करण्याच्या सुचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत.
पंचनाम्यांतील विलंबामुळे नुकसान कसे कळणार ?- प्रशासकीय यंत्रणा अतिवृष्टी आणि पीक नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीनेच करीत आहे. नुकसान झाले असेल, तर ते स्पष्ट होईल. शिवाय राज्यात राबविण्यात येत असलेल्या पीक कापणी प्रयोगातूनही शेतकºयांनी पेरलेल्या पिकांची स्थिती आणि त्यावर झालेला परिणाम दिसून येणार आहे. कोणाचे किती नुकसान झाले, तेसुद्धा त्या माध्यमातूून दिसून येणार आहे. गतवर्षीच्या हंगामात घरगुती बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. वाशिम जिल्ह्यात घरगुती बियाण्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे, ही बाब चांगली आहे. इतरही जिल्ह्यात हा उपक्रम चागल्या प्रकारे राबविण्याच्या सुचना देण्यात येतील. शेवटी शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी खर्चात बचत करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तथापि, यासाठी शेतकºयांनी बीज प्र्रक्रिया करावी आणि १० वर्षांच्या आतील बियाणे वापरावे.