लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्ह्यातील पैनगंगा, पूस, अडाण, बेंबळा या सारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रात पाणी अडवून शेतकºयांचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बॅरेजेस किंवा कोल्हापुरी बंधाºयांची उभारणी करण्यात आली. यात एकट्या वाशिम जिल्ह्यातच उकळी, अडगाव, गणेशपुर, कोकलगाव, ढिल्ली, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण आदि ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे संबंधित भागांतील शेतकºयांना मोठा फायदाही झाला आणि सिंचन क्षेत्रात वाढ झाली. या बॅरेजेसमुळे संबंधित गावांतील पाणी पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना भाजीपाला पिके घेणेही शक्य होऊ लागले; परंतु या बॅरेजेसची देखभाल आणि साठवण क्षमता कायम ठेवण्याबाबत फारशी गंभीरता बाळगण्यात आली नाही. त्यामुळे या बॅरेजेस लगत मोठ्या प्रमाणात गाळ साचत आहे. त्यामुळे या बॅरेजेसलगत पाणी साचण्याचे प्रमाणही कमी झाले असून, आता जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यातच कोरडे पडल्याने संबंधित बॅरेजवर अवलंबून असलेल्या शेतकºयांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्याशिवा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीवर पुन्हा परिणाम होऊन ती खालावत आहे. त्यातच काही बॅरेजेस जीर्ण होत आहेत. संबंधित विभागाने या बॅरेजेसची पाहणी करावी आणि गाळाचा उपसा करून बॅरेजेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 3:42 PM