शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अधिक वसुलीचे फिडरही भारनियमनाच्या विळख्यात!

By admin | Published: May 09, 2017 2:21 AM

वीज पुरवठय़ाचे नियोजन करण्यात महावितरण अपयशी.

वाशिम : महावितरणकडून "ए" पासून "जी" पर्यंत ग्रुपनिहाय फिडरवरून ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यापैकी साधारणत: "ए", "बी", "सी" आणि "डी" या चार ग्रुपच्या फिडरवर वसुलीचे प्रमाण तुलनेने अधिक राहत असल्याने विजेचे भारनियमन केले जात नाही. मात्र, वाढत्या तापमानामुळे यंदा अधिक वसुलीच्या या फिडरवरही सहा ते सात तासांचे "फोर्स लोडशेडिंग" केले जात आहे. याशिवाय इतरही ग्रुपवर अतिरेकी तथा अघोषित भारनियमन सुरू असून, वीज पुरवठय़ाचे नियोजन करण्यात महावितरण सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे २ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. ५४ गावठाण फिडरवरून ग्रामीण भागात; तर ९ फिडरवरून शहरी भागात वीज पुरवठा केला जातो. त्यापैकी केवळ १४ फिडर ए,बी,सी,डी या प्रवर्गात मोडतात; तर २७ फिडर इ, एफ आणि १२ फिडर जी-१, जी-२, जी-३ या प्रवर्गात मोडत असल्याने संबंधित फिडरवरील ग्राहकांना भारनियमनाचा अधिक त्रास सोसावा लागत आहे. जिल्ह्यात ४८ हजारांच्या आसपास ग्राहकांकडे एप्रिल २0१७ अखेर सुमारे २0 कोटी रुपये थकबाकी असून, ती वसूल करण्यात महावितरण बहुतांशी अपयशी ठरली आहे. त्यामुळेच ह्यडेंजर झोनह्णमध्ये असणार्‍या ह्यइह्ण पासून ह्यजी-३ह्ण पर्यंतच्या ग्रुपमध्ये अधिक ग्राहकांचा समावेश झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृषिपंपाच्या वीज पुरवठय़ातही कपात!विजेची वाढती मागणी आणि पुरवठय़ाचा मेळ घालण्यात अडचणी येत असल्याचे कारण समोर करत महावितरणने कृषिपंपाच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार, कृषिपंपांना यापुढे दिवसा ८ तास व रात्री ८ तास अशा दोन टप्प्यांमध्ये रात्री १ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंतच वीज मिळणार आहे. त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या उन्हाळी पिकांवर जाणवणार असून, तुलनेने अधिक पाणी आवश्यक असणारे भुईमूग हे पीक धोक्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेले भारनियमन आटोक्यात आणण्याचे पुरेशे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विजेच्या वाढत्या मागणीमुळे ही बाब शक्य होत नसून, अधिक वसुलीच्या फिडरवरही ह्यफोर्सह्ण भारनियमन करावे लागत आहे. - दीपक मेश्रामकार्यकारी अभियंता, महावितरण