जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. ७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार २३५ वर पोहोचला आहे. त्यातील १६० जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण वाशिम तालुक्यात; तर सर्वात कमी प्रमाण मानोरा तालुक्यात राहिले आहे. सप्टेंबर २०२० या एकाच महिन्यात कोरोनाने ५६ लोकांचा बळी घेतला होता. दरम्यान, कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये १९ ते ३० वयोगटातील २, ३१ ते ५० वयोगटातील ३२, ५१ ते ६० वयोगटातील ४०, ६१ ते ७० वयोगटातील ५२ आणि ७१ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ३४ जणांचा समावेश आहे.
...................
लिंगनिहाय जिल्ह्यातील मृत्यू
११२/४८
................
तालुकानिहाय मृत्यू
वाशिम - ५४
मालेगाव - २३
रिसोड - ३२
कारंजा - २४
मंगरूळपीर - २३
मानोरा - ०४
.........................
वयोगटानुसार मृत्यू
१९ ते ३० - ०२
३१ ते ५० - ३२
५१ ते ६० - ४०
६१ ते ७० - ५२
७१ पेक्षा जास्त - ३४
.................
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद
कोरोना विषाणू संसर्गाने जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील १६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात पुरूषांचे प्रमाण ११२; तर महिलांचे प्रमाण ४८ आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२० या महिन्यातच कोरोना मृत्यूचा आलेख अचानक उंचावला. या एकाच महिन्यात ५६ जणांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला. चालू वर्षातील जानेवारीत ७ मृत्यू झाले; तर फेब्रूवारी महिन्यात एकही मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही.
........................
वाशिम तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद
जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात कोरोनाने सर्वाधिक ५४ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतलेली आहे. त्यापाठोपाठ रिसोड तालुक्यात ३२, कारंजा तालुक्यात २४, मंगरूळपीर आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी २३; तर मानोरा तालुक्यात कोरोनाने केवळ ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
.................
महिनानिहाय मृत्यू
जून - ०१
जुलै - १४
ऑगस्ट - २७
सप्टेंबर - ५४
ऑक्टोबर - २९
नोव्हेंबर - ०५
डिसेंबर - ०५
जानेवारी - ०७
फेब्रुवारी - ००
...........................
७२३५
एकूण रुग्ण
६९५१
कोरोनामुक्त झालेले
१६०
एकूण कोरोना मृत