वाशिम - पाच महिन्याच्या पोटच्या गोळ्य़ाला बेवारस सोडून एका मातेने पलायन केल्याची घटना कोंडाळा झामरे येथील कोंडेश्वर महादेव मंदिरासमोर आज दि.१५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास मंदिरासमोर पाच महिन्याचे गोेंडस बाळ रडत असल्याचे येथील लोकांच्या निदर्शनास आले. मात्र या बाळाच्या आजुबाजुला कोणीच नसल्यामुळे कोणीतरी बाळ ठेवून पलायन केल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या घटनेची माहिंती येथील पोलीस पाटील नवृत्ती झामरे यांनी वाशिम ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर पीएसआय मिलींद पाठक यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी हे पुरूष जातीचे अंदाजे पाच महिन्याचे जीवंत बाळ ताब्यात घेतले. पोलिसांनी या बाळाच्या आईचा शोध सुरू केला आहे. परंतु रात्री उशीरापर्यत काहीच मागमूस लागला नाही. सध्यास्थितीत बाळ शासकीय रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेविरू ध्द भादंविच्या कलम ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
५ महिन्याच्या बाळास मंदिरासमोर सोडून माता पळाली
By admin | Published: October 16, 2015 2:00 AM