लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०११ पासून संग्राम आणि गत काही महिन्यांपासून आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आॅनलाईन सेवा पुरविणाºया संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी ‘एल्गार’ पुकारला आहे. २० आॅगस्टपासून पुकारलेले कामबंद आंदोलन सुरूच असून वाशिमच्या पंचायत समिती कार्यालयासमोर परिचालकांनी बुधवार, २८ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन केले.यासंदर्भात गटविकास अधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे, की राज्य शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अंमलात आलेल्या संग्राम संगणक प्रणाली आणि आता आपले सरकार सेवा केंद्रांवर कार्यरत संगणक परिचालकांना विविध स्वरूपातील प्रश्न भेडसावत आहेत. तथापि, सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देण्यात यावे, परिचालकांना रुजू केलेल्या ग्रामपंचायतीमध्येच कार्यरत ठेवावे, कामात वारंवार अडथळा निर्माण करून दडपण आणण्यांवर कार्यवाही करावी, कोणतेही कारण नसताना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाºयांवर कार्यवाही व्हावी, आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी संगणक परिचालकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. त्यानुषंगाने वाशिमच्या पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनकर्त्यांमध्ये महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह आपले सरकार सेवा केंद्रांवर कार्यरत अनेक संगणक परिचालकांचा समावेश आहे.
संगणक परिचालकांचे वाशिममध्ये धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 4:40 PM