वाशिम - जिल्ह्यात गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानापोटी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
वाशिममध्ये गारपिटग्रस्तांना मदतीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 6:56 PM