वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू करावी, असा सूर प्राचार्यांसह विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.
कोरोनामुळे गतवर्षातील मार्च महिन्यापासून शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. यंदाही २६ जूनपासून प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळा सुरू झाल्या नाहीत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये का नाही? असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
००००००००००००
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये २७
०००००००
एकूण विद्यार्थीसंख्या २२३८०
००००००००
शाखानिहाय विद्यार्थीसंख्या
विज्ञान ८७०४
वाणिज्य १७९०
कला ११८८६
००००००००००००
प्राचार्यांची तयारी
कोट
कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. याच धर्तीवर वरिष्ठ स्तरावर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात. महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली तर निश्चितच प्रभावी नियोजन केले जाईल.
- डॉ. मीलनकुमार संचेती, प्राचार्य
००००००००
कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने महाविद्यालयेदेखील सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे खबरदारी घेऊ शकतात. महाविद्यालय प्रशासनदेखील योग्य ती खबरदारी घेते. परवानगी मिळाली तर संपूर्ण तयारी केली जाईल.
- जी. एस. कुबडे, प्राचार्य
०००००००
महाविद्यालये सुरू होण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
कोट
आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालयेदेखील सुरू करायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- गौरव गायकवाड, विद्यार्थी
०००००००००००
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण यामध्ये खूप फरक आहे. महाविद्यालयात प्रत्यक्ष शिक्षण मिळणे आवश्यक ठरत आहे.
- हर्षल गव्हांदे, विद्यार्थी