शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 3:38 PM

वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे. दरम्यान, न्याय न मिळाल्यास २१ मार्च रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निवासस्थानासमोर बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि उप सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मागील चार महिन्यांपासुन तालुकास्तरीय व दोन महिन्यांपासुन जिल्हास्तरीय कर्मचारी यांचे वेतन झाले नाही. मागील वर्षभरापासुन कर्मचा-यांना प्रवास भत्ता मिळाला नाही. तीन- तीन महिने कर्मचारी यांना पगार मिळाला नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याबाबत यापुर्वीही राज्यस्तरावर कळविण्यात आले होते. तसेच विभागीय आयुक्तांना भेटुन निवेदन दिले होते.  शासनाच्या पत्रानंतर केवळ एकदा वेतन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कक्षातील कर्मचारी यांना लक्ष्य करण्यात आले होते. आकसापोटी काहींची चौकशी लावली होती तर काही कर्मचारी यांना मुळ वेतनावर आणले आहे, असा आरोप कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. केंद्र शासनाच्या निवडलेल्या भारतातील १०१ आकांक्षित जिल्हयात वाशिमचा समावेश आहे. वेतन न झाल्याने कर्मचाºयांसह कुटुंबियांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. काही कर्मचाºयांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, या मागणीसाठी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले असून, तिसºया दिवशीही कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनावर होते.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन