वाशिम : कोरोना काळात राज्यातील आरोग्य कर्मचारी, शिक्षकांना विमा कवच देण्यात आले. दुसरीकडे गावपातळीवर काम करणाºया तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच नसल्याने या संदर्भात संघटनेने शासनस्तरावर मागणी लावून धरली. याची दखल घेऊन महसूल विभाग १ आॅक्टोबर रोजी संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे.राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, उपचार, प्रतिबंध, चाचणी, मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावणाºया आरोग्य कर्मचाºयांसाठी २८ मार्च २०२० रोजी विमा कवच योजना लागू करण्यात आली. या योजनेची व्याप्ती वाढवित शिक्षक, अंगणवाडी कर्मचाºयांसह अन्य प्रवर्गातील कर्मचाºयांनाही विमा कवच लागू करण्यात आले. परंतू, गाव पातळीवर कोरोनाशी संबंधित कामे करणारा महत्वाचा दूवा असलेले राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांना अद्याप विमा कवच मिळाले नाही. या कर्मचाºयांनाही विमा कवच मिळावे यासह अन्य मागण्या तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने महसूल विभागाकडे लावून धरल्या. याची दखल घेत महसूल मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत १ आॅक्टोबर रोजी महसूल अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चेचा प्राथमिक टप्पा म्हणून विभागीय आयुक्त, कोकण यांचे कार्यालय, मुंबई येथे बैठक पार पडणार आहे. महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाºयांना विमा कवच मिळावे, सामुग्रह अर्थसहाय्य मंजूर करावे यासह तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या अन्य समस्यांवरही चर्चा होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. कोरोनाशी संबंधित कामे करणारा तलाठी हा घटक अद्याप विमा कवचपासून वंचित आहे. याशिवाय तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या अन्य मागण्याही प्रलंबित आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी महसूल मंत्री व वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाºयांशी बैठक होत आहे.- शाम जोशी, राज्य अध्यक्षतलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ.
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच देण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 4:38 PM