शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

महावितरणने गोळा केले ४७ हजार ग्राहकांचे मोबाइल क्रमांक

By admin | Published: July 06, 2017 1:16 AM

कर्मचाऱ्यांचे यशस्वी प्रयत्न : विजेसंदर्भातील माहिती मिळणार ‘मोबाइल’वर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महावितरणने जवळपास सर्वच ग्राहक सेवा ‘आॅनलाईन’ उपलब्ध केल्या असून त्या ग्राहकांना सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘महावितरण’च्याच माहिती व तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असणारे चार मोबाईल अ‍ॅप देखील विकसित केले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विद्यूत ग्राहकांचे मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू असून ५ जुलैपर्यंत २ लाख २० हजार २६४ ग्राहकांपैकी ४७ हजार ४४७ ग्राहकांचे मोबाईल क्रमांक गोळा झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दिली.महावितरणने विकसीत केलेल्या विविध स्वरूपातील मोबाईल अ‍ॅपव्दारे वीजबिल पाहणे, ते आॅनलाईन भरणे यासह इतरही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बिल भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसोबतच मोबाईल वॅलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली अथवा नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेली आहे. ज्या ग्राहकांचे रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश पाठविला जाईल. त्यानंतर ग्राहकांना आपल्या मीटरचा फोटो काढून रीडिंग नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील. सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदविण्याची सोय त्यात असणार आहे. त्यानुषंगाने गेल्या काही दिवसांपासून जनमित्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच गावांमधील ग्राहकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू असून आतापर्यंत ४७ हजार ४४७ ग्राहकांचे मोबाईल प्राप्त झाले असून इतर ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले मोबाईल नंबर महावितरणला देवून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी केले आहे.